Land Record जमिनीचे सर्व जुने सातबारा फेरफार नोंदी पहा तुमच्या मोबाईलवर

  



Land Record जमिनीचे सर्व जुने सातबारा फेरफार नोंदी पहा तुमच्या मोबाईलवर

जर आपल्याला जमिनीसंबंध कोणत्याही व कश्याही प्रकारचा व्यवहार करायचा असेल तर आपल्याला त्या जमिनीची पूर्ण माहिती असणं  खूप महत्वाचं असते हीच माहिती सरकारनं आपल्याला ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली गेली आहे.ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळपास जुनेअभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे पण, हे उतारे कसे पाहायचे याचीच माहिती आपण  आज या लेखात पाहणार आहोत ते कसे खालील प्रमाणेLand Record. 


जुने अभिलेख कसे पाहायचे ते पाहूया ? 

1. जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला NLRMP (mahabhumi.gov.in) वेबसाईट वर जावे लागणार आहे. 

2. त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होणार आहे. 

3. इथं e-Records (Archived Documents) या नावाचं एक पेज तुम्हाला ओपन होईल.

 4. या पेजवर उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकत आहात. 

5. तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदनों णी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकत आहात. 

6. पण, जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथं नवीन वापरकर्ता नोंदनों णी या पर्यायावर क्लिक करायचे असणार आहात. 

7. एकदा का तुम्ही इथं क्लिक केलं की एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. 

8. यामध्ये तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव आणि त्यानंतर जेंडर मेल आहे की फिमेल, नॅशनलिटी म्हणजेच राष्ट्री यत्व, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. 

9. त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता ते सांगायचं आहे, जसं की business, service कि other म्हणजेच यापैकी वेगळं काही करता ते सांगाव लागणार आहे. 

10. यानंतर मेल-आयडी आणि जन्मतारीख टाकायची.

11. वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर आपला  पत्त्याविषयीची माहिती टाकायची. 

12. त्यानंतर Pincode टाकायचा आहे आणि  पिन कोड टाकला की जिल्हा आणि राज्याचं नाव आपोआप फॉर्मवर येऊन जातं. 

13. ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन -आयडी तयार करायचा आहे. 

14. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि त्यानंतर Captcha टाईप करायचा आहे. म्हणजे इथं दिसणारे आकडे किंवा अक्षरं पुढच्या कप्प्यात जशाच्या तसे लिहायचे आहेत. 

15. सगळ्यात शेवटी सबमिट बटन दाबावे लागणार आहे. 

16. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर वापरकर्ता नोंदनों णी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा लॉगइन करण्यासाठी, असा मेसेज येईल तसेच यावरील इथे क्लिक करा या शब्दांवर तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे. 

17. आता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेलं यूझरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्हाला परत लॉग इन या बटनावर क्लिक  करावे चे आहे.


सुरुवातीला फेरफार उतारा कसा पाहायचा ते बघूया.Land Record

यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडावा लागणार आहे.

. पुढे तालुका चे नाव, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार निवडा लागणार आहे. यात तुम्हाला कोणता उतारा हवा आहे तो निवडा लागणार आहे. 

आता मी फेरफार उतारा निवडला आहे आणि जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा, आठ-अ हवा असेल तर आठ-अ पर्याय निवडाव लागणार आहे. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध असणार आहेत.

. त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. 

त्यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसणार आहे.

. फेरफाराचं वर्षं आणि क्रमांक तिथं दिलेला असतो आणि तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकत आहात. 

उदाहरणार्थ समजा मला १९९० मधील फेरफार पाहायचा आहे म्हणून मी त्यासमोरील कार्टमध्ये ठेवा या पर्यायावर क्लिक केलं  गेले आहे. 

त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.त्यानंतर तुमचं कार्ट तुमच्यासमोर ओपन होईल आणि त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाऊनलोड सारांश नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल, इथं तुमच्या फाईलची सद्यस्थिती उपलब्ध आहे अशी दिली आहे. 

त्यासमोरील फाईल पहा या पर्यायावर क्लिक केलं की तुमच्यासमोर १९९० चं फेरफार पत्रक ओपन होईल. 

या पत्रकावरील खाली बाण असलेल्या चिन्हावर तुम्ही क्लिक केलं की ते डाऊनलोड होणार आहे. 

त्यानंतर १९९०  सालचा फेरफार उतारा पाहू शकता. यात जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल झाले, ते कधी झाले याची संपूर्ण माहिती दिलेली असते. 

याचपद्धतीनं तुम्ही सातबारा असा अभिलेखाचा प्रकार निवडला आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रकिया केली तर जुना सातबारा उताराही इथं पाहू शकत आहात.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या